जातनिहाय जनगणना....पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भटके विमुक्त आघाडीच्यावतीने आभार ...बबन बारगजे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करून निर्णयाचे स्वागत केले
पनवेल - जातनिहाय जनगणना होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भटके विमुक्त आघाडीच्यावतीने आभार मानण्यात आली असून बबन बारगजे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करून निर्णयाचे स्वागत केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी संपूर्ण भारतभर जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे उपेक्षित वंचित गरीब घटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे कारण १९३१ नंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होत आहे या निर्णयामुळे अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण होईल असे भाजपा भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी म्हटले आहे.काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात फक्त आश्वासन दिली परंतु ती कधीही पूर्ण केली नाहीत. 2010 साली लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी संसदेमध्ये जातनिहाय जनगणनेचा विषय मांडला होता. 2011 साली तेव्हाच्या मनमोहन सिंग सरकारने घोषणाही केली परंतु प्रत्यक्षात जनगणना झालीच नाही त्यामुळे सर्व ओबीसी भटके विमुक्त व दलित आदिवासी यांची मागणी होती की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी मंजूर केली त्याबद्दल समस्त ओबीसी भटके विमुक्त व सर्व समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.ही घोषणा झाल्यानंतर भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडळामध्ये एकमेकांना पेढे भरून व फटाके वाजवून मोदीजींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे श्री.बबन बारगजे यांनी काही दिवसापूर्वी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना निवेदन दिले होते की, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि तो निर्णय झाला व त्यामुळे बबन बारगजे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत .
Post a Comment