श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल (संजय कदम): प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आध्यात्मिक उपस्थितीत पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साई नारायण बाबा आश्रमात हजारो शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप आज करण्यात आले.
प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने ५० व्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत आज पनवेल पंचक्रोशीतील पहिली ते आठवीतील शाळेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंसह खाऊचे वाटप करण्यात आले.आज पार पडलेल्या कार्यक्रमात श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी,सेक्रेटरी रामलाल चौधरी,राम थडानी,डॉ शकुंतला भटिजा यांच्यासह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना साईबाबा मंदिरामध्ये वाटप करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिखसक वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment