पनवेलजवळील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लष्कराच्या विमानांचे यशस्वी लँडींग ... धावपट्टीची यशस्वी चाचणी ... देशातील सर्वात मोठे विमानतळ ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पनवेल- पनवेलजवळील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लष्कराच्या विमानांचे आज यशस्वी लँडींग झाले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट,रायगडचे खासदार सुनील तटकरे,मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीमध्ये ही यशस्वी चाचणी झाली.सुखोई हे लढाऊ विमानही या धावपट्टीवर उतरवण्यात आलं.विमाने धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरल्याने त्यांचे वॉटर सॅल्यूटने स्वागत करण्यात आले.यावेळी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,हा विमानतळ देशातील सर्वात मोठा विमानतळ ठरेल.अद्यावत असे आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल असे सांगितले. या धावपट्टीवरून २०२५ पासून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
Post a Comment