तळोजा मध्यवर्ती कारागृहातील शिपायाकडील जेवणाच्या डब्यात सापडला अंमली पदार्थाचा साठा
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः तळोजा मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या शिपायाची तो रात्री पाळी करता आला असता त्याची अंगझडती केली असता त्याच्याकडील जेवणाच्या डब्याच्या पिशवीमध्ये जवळपास 10 लाख 8 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ आढळून आल्याने त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.जयवंत जाधव (49) हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात कारागृहीन हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते 9/10/2024 रोजी 17.15 वाजण्याच्या सुमारास कारागृहामध्ये रात्र पाळी कर्तव्याकरिता आरोपी अनिल असाराम जाधव (38 रा.बांद्रा) हा आला असताना जयवंत जाधव यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जेवणाच्या डब्याच्या पिशवीमध्ये जवळपास 10 लाख 8 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ कारागृहातील न्यायबंदी यांना सेवन करण्याकरिता पुरविण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बेकायदेशीररित्या बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्याने त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला खारघर पोलिसांनी अटक केली आहे.
Post a Comment