News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल शहरातील भारत नगरातील अनधिकृत बांधकामे आणि वीज पुरवठा यावर कारवाई करण्याची हिंदूची मागणी

पनवेल शहरातील भारत नगरातील अनधिकृत बांधकामे आणि वीज पुरवठा यावर कारवाई करण्याची हिंदूची मागणी

पनवेल - : पनवेल शहरातील भारत नगर येथील अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत तसेच त्यांना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठा कसा केला जातो. यावर  पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर धडक कारवाई करावी अशी मागणी आज हिंदूच्यावतीने महापालीकेचे उपायुक्त व महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदन द्वारे केली आहे. 

शहरातील भारत नगर परिसरात झोपडपट्टी ही बहुतांशी अनधिकृतपणे वाढू लागली आहे.या झोपडपट्टीत अनधिकृत वीज कनेक्शन दिले गेले असल्याचे समजते.तसेच याठिकाणी बहुतांशी बांगलादेशी आणि रोहिंगे वास्तव्यास आहेत. तरी सदर ठिकाणी तातडीने योग्य ती कारवाई करावी. त्याच प्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांच्या फळांच्या हातगाड्या व नारळ विक्रेते अचानकपणे गल्ली गल्लीत वाढू लागले आहेत.त्यांच्या हातगाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.तरी अश्या हातगाड्या व नारळ विक्रेत्यांवरसुद्धा पनवेल महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment