महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्टीजच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक अरविंद सावळेकर
पनवेल ( संजय कदम ) : महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्टीजच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी बांधकामव्यावसायिक अरविंद सावळेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात माजी अध्यक्ष महेश नागराजन यांनी त्यांना पदभार दिला असून याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित रायगड जिल्हाअध्यक्ष अरविंद सावळेकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे .
११ व्या वार्षिक बैठकीमध्ये व चेंज ऑफ गार्ड या कार्यक्रमामध्ये क्रेडाई या राष्ट्रीय संस्थेच्या अंगीकृत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्टीज च्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी बांधकामव्यावसायिक अरविंद सावळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीत अरविंद सावळेकर यांनी पदभार स्वीकारला.या कार्यक्रमाला एमसीए मेनचे अध्यक्ष डॉमिनिक रोमेल,उपाध्यक्ष शैलेश पुराणिक , सीओ केवल वालंबिया ,एमसीए नवी मुंबई अध्यक्ष मदन जैन,महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे सरचिटणीस तुकाराम दुधे,एमसीएचे माजी अध्यक्ष राजेश प्रजापती ,विकास भारंबे ,विलास कोठारी ,अतिक खोत ,किरण बागड , मधु पाटील यांच्यासह नवी मुंबई,मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते .
पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित रायगड जिल्हाअध्यक्ष अरविंद सावळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,सदर संस्था ही बांधकाम व्यावसायिकांची असली तरी प्रामुख्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम कार्यकाळामध्ये राबवणार असून लवकरच वृक्षारोपण हा कार्यक्रम भव्य प्रमाणात राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी अनेक उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
Post a Comment