News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उलव्यातील सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांची विधिमंडळाला भेट

उलव्यातील सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांची विधिमंडळाला भेट

पनवेल (प्रतिनिधी)-  रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल हे शिक्षण प्रदान करणारे प्रख्यात शैक्षणिक संस्थान असून, येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन करण्यात येते,याचाच एक भाग म्हणून स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयातील इयत्ता सातवी आणि आठवीच्या ५८ विद्यार्थी व ४ शिक्षकांच्या समूहाने महाराष्ट्र  विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन व ग्रंथालयास भेट दिली. 
 
या भेटीदरम्यान स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अधिवेशन पाहण्याचा लाभ देण्यात आला ज्यातून विद्यार्थ्यांना कामकाजबद्दल तसेच विधानभवन वास्तू विविध मंत्री दालने, त्यांचे कक्ष यांची माहिती देण्यात आली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाहण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना लाभला. त्यामुळे भावी पिढीला अत्यंत अभ्यासपूर्ण अशा कार्याचा लाभ घेता आला असून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.यावेळी विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर,उपशिक्षक हर्षल फडके,उपशिक्षिका मनिषा मोरे आणि नेहा ठाकूर, उमेश पोद्दार आदी उपस्थित होते. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment