रयत'चे माजी विद्यार्थी,दानशूर व्यक्तिमत्त्व महेंद्रशेठ घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार!
उलवे : रयत'चे माजी विद्यार्थी,दानशूर व्यक्तिमत्त्व महेंद्रशेठ घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कोकणामध्ये रयत शिक्षण संस्थेचे रोपटे ७० वर्षांपूर्वी अनेक शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी लावले.आज त्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर,महेंद्रशेठ घरत यांच्यासारख्या असंख्य विद्यार्थांचे शिक्षण 'रयत'मुळे झाले.त्यामुळे आज ते यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना आपले आयुष्य 'रयत'मुळेच घडले हे न विसरता कोकणातील विद्यार्थी आपल्या विभागातील शाळा-महाविद्यालयांसाठी भरीव आर्थिक मदत करतात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांच्या इमारत बांधकामासाठीसुद्धा आर्थिक साह्य करीत आहेत.'रयत'च्या माध्यमातून अण्णांनी शिक्षणाची गंगा आणून अशी माणसे पेरली की तीच आज समाजासाठी झटत आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मत अहिल्यानगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या चिंचोटी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या उदघाटनप्रसंगी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.त्यांच्या हस्ते चिंचोटी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.
Post a Comment