सामाजिक उपक्रमांनी डायमंड स्पिरिट फाऊंडेशन आपला ४ था वर्धापन दिन रविवारी साजरा करणार
पनवेल - सामाजिक बांधिलकी जपत डायमंड स्पिरिट फाऊंडेशन आपला ४ था वर्धापनादिन सामाजिक कार्यक्रम उपक्रमांनी साजरा करणार आहे.
पनवेल तालुक्यातील कुष्ठरोग निवारण केंद्र शांतीवन,नेरे येथे होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये शांतीवनातील कुष्ठरोग केंद्रामधील रुग्णांसाठी जेवण,आहार विषयक व्याख्यान आणि मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले आहे.कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून पनवेल टाइम्सचे संपादक श्री.गणेश कोळी उपस्थित राहणार आहेत.हा वर्धापन दिन येत्या रविवारी ५ एप्रिल २०२६ सकाळी १० वाजता शांतीवन नेरे येथे होणार आहे,आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक डायमंड स्पिरिट फाऊंडेशनच्या अध्यक्षा नम्रता धनवडे, शुभदा भूकन,संध्या बेले,रूपाली जोशी,उज्वला राले,अलका आव्हाड आणि आदिती उपासनी,सौजन्य पास्ते,रचना जोशी,शोभा ठोंबरे यांनी केले आहे.
Post a Comment