News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण बस अपघात; पनवेलच्या विभुते कुटुंबावर काळाचा घाला,नीलम विभुते यांचा मृत्यू,

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण बस अपघात; पनवेलच्या विभुते कुटुंबावर काळाचा घाला,नीलम विभुते यांचा मृत्यू,

पनवेल दि ३ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी पहाटे सुमारे ३ वाजता ‘ओमकार ट्रॅव्हल्स’ची खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती.बसमध्ये पनवेलमधील विभुते कुटुंबीय, त्यांचे सहकारी आणि इतर प्रवासी असा एकूण प्रवास सुरू होता.सुकेळी खिंडीत बस पोहोचली आणि अचानक चालकाचा ताबा सुटला.वेगात धावणारी बस काही क्षणांतच उलटली.या अपघातात पनवेलमधील ‘ओम् सर्व्हिसेस’चे मालक वैभव विभुते यांच्या पत्नी नीलम विभुते (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरची ती पहाट इतर दिवसांसारखी नव्हती… सुकेळी खिंडीतील शांततेला अचानक भीषण अपघाताचा आवाज चिरून गेला आणि काही क्षणांतच आनंदाचा प्रवास दुःखाच्या काळोखात बदलला. शुक्रवारी पहाटे सुमारे ३ वाजता ‘ओमकार ट्रॅव्हल्स’ची खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये पनवेलमधील विभुते कुटुंबीय, त्यांचे सहकारी आणि इतर प्रवासी असा एकूण प्रवास सुरू होता. दिवसभराच्या थकव्यानंतर सर्वजण गाढ झोपेत होते.कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणांत आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे. सुकेळी खिंडीत बस पोहोचली आणि अचानक चालकाचा ताबा सुटला. वेगात धावणारी बस काही क्षणांतच उलटली.भीषण आवाज,काच फुटण्याचा कडाड,आणि त्यानंतर प्रवाशांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. झोपेतून जागे झालेल्या प्रवाशांना काय घडले हे समजण्याआधीच अनेकजण जखमी अवस्थेत बसमध्ये अडकले होते.

या अपघातात पनवेलमधील ‘ओम् सर्व्हिसेस’चे मालक वैभव विभुते यांच्या पत्नी नीलम विभुते (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आणखी एका प्रवाशाचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. एकूण ३८ प्रवासी जखमी झाले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले.उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. स्थानिकांनीही जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू ठेवले. जखमींना तातडीने नागोठणे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी कळंबोलीतील एमजीएम रुग्णालय आणि रोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्परतेने बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली, मात्र या अपघाताने पनवेल शहराला मोठा धक्का बसला आहे. एका आनंदाच्या सहलीवर निघालेल्या कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला आणि मागे राहिल्या त्या फक्त वेदनादायी आठवणी. या अपघातामागे नेमकं कारण काय, चालकाचा ताबा सुटला की तांत्रिक बिघाड झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. पण त्या पहाटेच्या काही क्षणांनी अनेकांच्या आयुष्यात कायमचा अंधार पसरवला आहे. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment