अनधिकृतपणे फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर पनवेल महापालिकेची तोडक कारवाई ... फूटपाथ स्वच्छ मोहिम
पनवेल,दि.1: पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर,दुकानदारांवर,व्यवसायिकांवर आज दिनांक 1 जानेवारी रोजी आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या सूचनेप्रमाणे प्रभाग समिती ब कळंबोली प्रभाग क्र १० मध्ये अतिक्रमण कारवाई करून ‘फुटपाथ स्वच्छ मोहिम’ राबविण्यात आली.
प्रभाग समिती ब कळंबोलीचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्याआदेशानुसार प्रभाग समिती ब कळंबोली प्रभाग क्र १० मध्ये फुटपाथवरील सर्व आतिक्रमणे काढण्यात आली.यावेळी आतिक्रमण विभाग व मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे,मुख्य स्वच्छता निरीक्षक योगेश कस्तुरे, स्वच्छता निरीक्षक दिग्नेश भोईर, अमोल कांबळे व अमित जाधव तसेच आतिक्रमणचे व स्वच्छतेचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी फूटपाथवरील दुकानांच्या नावांचे बॅनर्स, अनधिकृत वाढविलेले शेड, दुकानांतील सामान, टायर्स इतर सामान यावर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले.
महापालिका कार्यक्षेत्रात रस्त्यांवर ,फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर तसेच अनधिकृत बॅनरर्सवरती आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात येत आहे.
Post a Comment