News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड ...पनवेल शहरातील घटना

अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड ...पनवेल शहरातील घटना

पनवेल  ( संजय कदम ) : आपल्या १६ वर्षीय पुतणीला जबरदस्तीने स्वतःच्या कब्जात ठेवून तिच्या कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देणारा तसेच यावेळी त्याठिकाणी पोलीस पथक पोहचले असता त्यांच्यावर कुऱ्हाड व कोयत्याने हल्ला करून दोघाजणांना जखमी करणाऱ्या एका गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसानी ताब्यात घेतले आहे . 

आरोपी सोबन बाबुलाल महातो ( वय ३५ ) रा. मंगला निवासी,पनवेल याने बुधवारी रात्री ११. ३० च्या दरम्यान त्याच्या बिल्डिंग मधील दुसऱ्या रूमचे लॉक तोडून कुऱ्हाड व कोयता अश्या घातक शस्त्रांसह जबरदस्तीने रुममध्ये प्रवेश करून ही पूर्ण बिल्डिंग माझी आहे.मला जर कोणी अडवले तर सर्वाना ठार मारून टाकेन असे जोर जोरात आरडाओरडा केला .  या बाबतची माहिती पनवेल शहर पोलिसाना मिळताच त्याचे पथक त्याला ताब्यात घेण्यासठी सदर ठिकाणी गेले असता त्याने या पथकावर कुऱ्हाड व कोयत्याने हल्ला केला व यात पोना सम्राट डाकी,पोना रवींद्र पारधी याना गंभीर दुखापत केली.यावेळी वपोनि नितीन ठाकरे , पोनी शाकिर पटेल व पथकाने त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर येण्यास सांगितले असता त्याने त्याचे आई, वडील ,भाऊ व भावाची तीन मुले याना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला तसेच त्याने त्याची १६ वर्षीय पुतणी निकिता महातो हिला जबरदस्तीने स्वतःच्या कब्जात ठेवून तिच्या कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देत असताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण आत प्रवेश करून त्याला घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ - ३ चे प्रशांत मोहिते , सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आदींनी तातडीने पोलीस ठाण्यात पोहचून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे . 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment