स्व.मितेश रविंद्र जोशी यांच्या स्मरणार्थ आरोग्यसेवेचा कामोठ्यात उपक्रम
पनवेल - भाजपा कामोठे मंडळाचे माजी शहराध्यक्ष रवींद्र जोशी यांचे सुपुत्र मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने व साई द्वारका हॉस्पिटल यांच्या सहकार्याने कामोठे येथे मोफत भव्य महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.हा उपक्रम स्व.मितेश रविंद्र जोशी यांच्या पवित्र स्मृतीला वाहिलेली आदरांजली ठरली.या शिबिरात विविध आजारांवरील तपासणी,उपचार आणि रक्तदानासारख्या जीवनदायिनी कृतीद्वारे अनेक गरजू रुग्णांना मदत मिळाली.
यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.त्यांच्या या समाजोपयोगी योगदानामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे.सामाजिक बांधिलकी जपत,आरोग्यसेवेच्या माध्यमातून लोकहितासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आणि स्तुत्य आहे असे मत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.
Post a Comment