हिंदी सक्ती’च्या निर्णयाची पनवेलमध्ये उबाठा शिवसेना,मनसे,शेकाप,काँग्रेस यांच्यावतीने होळी ...मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया
पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र द्रोही सरकारच्या मराठी भाषेवर होणाऱ्या आक्रमणाविरोधात हिंदी सक्तीचा जो जीआर भाजप महायुती सरकारने काढलाय त्या जीआरची होळी पनवेल तालुक्यातील उबाठा शिवसेना,मनसे,शेकाप,काँग्रेस यांच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या समोर पनवेल येथे करण्यात आली.
यावेळी महाविकास आघाडी सोबत शेकापचे मा.आमदार बाळाराम पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत , मनसे प्रवक्ता योगेश चिल्ले,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन कलावत,शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील,शेकापनेते काशिनाथ पाटील,शिरीष घोटाळा ,शशिकांत डोंगरे,महानगर प्रमुख अवचित राऊत यांच्यासह पुरूष पदाधिकारी,महिला आघाडी पदाधिकारी,युवासेना पदाधिकारी तसेच मराठी प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment