News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल मनपाची डॅशिंग नारी...अमेरिकेत ठरली सर्वात भारी...जागतिक स्पर्धेमध्ये शुभांगीला कांस्य पदक

पनवेल मनपाची डॅशिंग नारी...अमेरिकेत ठरली सर्वात भारी...जागतिक स्पर्धेमध्ये शुभांगीला कांस्य पदक

पनवेल दि.30:- पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील डॅशिंग महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या  21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळाले आहे. उत्तुंग अशा या यशाबद्दल मनपाचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी शुभांगी यांचे विशेष अभिनंदन केले.

अल्बामा,अमेरिका येथे  शुभांगी संतोष घुले यांनी भारत देशाच्या संघात सहभागी होऊन 2025 च्या 21 व्या जागतिक पोलिस  व अग्निशमन स्पर्धेत "ULTIMATE FIRE FIGHTING CHALLENGE" या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले.

या स्पर्धेतील तिचा हा पराक्रम देशाच्या क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.अल्बामा येथे 2025 मध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत, जगातील अग्निशमन आणि पोलिस दलांचे उत्कृष्ट संघ सहभागी झाले होते.ही स्पर्धा अग्निशमन, पोलिस दल आणि बचाव कार्यातील व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेणारी होती. यात जगभरातून 50 देश सहभागी झाले होते. शुभांगी यांनी इतर देशांच्या स्पर्धकांशी सामना करत, या कठीण आणि तडफदार स्पर्धेत आपला जलद आणि उत्कृष्ट कामगिरीचा दाखला देत कांस्य पदक प्राप्त केले.

याआधी एप्रिल महिन्यात नवी दिल्ली येथे त्यागराज स्टेडियमवरती झालेल्या ऑल इंडिया नॅशनल फायर सर्व्हिस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्यावतीने थर्ड इडिएशन ऑफ ऑल इंडिया फायर सर्व्हिसेस स्पोर्ट्स ॲन्ड फायर सर्व्हिसेस मीट 2025 मध्ये झालेल्या थाळीफेक  व गोळा फेक या दोन्ही खेळामध्ये अग्निशामक शुभांगी संतोष घुले यांनी सुवर्ण पदक मिळवले होते.या दैदिप्यमान कामगिरीबद्दल अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे,परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे तसेच महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शुभांगी यांचे अभिनंदन केले आहे.
 
शुभांगीची प्रतिक्रिया:
“ही स्पर्धा माझ्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव होता. माझ्यासाठी माझ्या प्रशिक्षकांचा आणि कुटुंबीयांचा, महापालिकेचा पाठिंबा नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. यापुढेही मी अधिक मेहनत करून आणि भारताचे नाव उच्च ठरवण्याचे काम करीन.”

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment