मुसळधार पावसामुळे पनवेलकरांचे जनजीवन विस्कळीत ...अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती
पनवेल दि.१८(वार्ताहर): गेल्या २४ तासांहून जास्त काळ पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलकरांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते.अनेक चाकरमान्यांचे आज सकाळी कामावर जाताना चांगलेच हाल झाल्याचे चित्र दिसत होते.
पनवेल शहरासह नवीन पनवेल,करंजाडे, कामोठे, कळंबोली, खांदावसाहत,खारघर आदी भागातील सखल भागात पाणी साचले होते.त्यातच रस्त्यांना असलेल्या खड्ड्यंमुळे वाहने हळुवारपणे चालत होती.करंजाडेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.येथील ओढा नाला हा कमी रुंदी व उथळ असल्याने यंदाच्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रमाण वाढले होते.याचा त्रास येथील रहिवाश्याना होताना दिसत होते. अनेकांनी कामावर जाण्यापेक्षा घरी राहणेच पसंत केले.अनेक दुकानात व तळ मजल्यावर असलेल्या घरांमध्येसुद्धा पाणी साचले होते.एस टी बसेस, एनएमएमटी बसेस उशिराने रस्त्यावर धावत होत्या.
Post a Comment