लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूर कर्णाचा अवतार - उपमुख्यमंत्री अजित पवार
पनवेल (प्रतिनिधी) - माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूर कर्णाचा अवतार आहे,त्यांचा सारखा दिलदार पण हा मी कोणामध्येच पाहिला नाही.पैसे तर सगळेच कमावतात मात्र ते देण्याची दानत हि फक्त रामशेठ ठाकूर यांच्यामध्येच आहे.त्यामुळे मी महाराष्ट्राच्या तमाम १३ कोटी जनतेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईश्वरपूर येथे केले.
सांगलीतील ईश्वरपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्राध्यापक डॉक्टर एन.डी.पाटील विधी महाविद्यालय,श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉक्टर एन.डी.पाटील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर एन.डी.पाटील बहुउद्देशीय सभागृहासाठी जिल्हा योजना अनुदानातून दहा कोटी रुपये देण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एक कोटी रुपयांची तर आमदार रोहित पवार यांनी 40 लाख रुपयांची देणगी जाहीर केली.यावेळी संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील यांनी बहुउद्देशीय सभागृह वास्तूसाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.हे तीनही उपक्रम केवळ संस्थात्मक विकासाची नवी पायरी नसून,शिक्षण,सामाजिक जागृती,न्याय,कला-संस्कृती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात समाजाला बहुआयामी फायदे देणारी ऐतिहासिक पाऊल ठरणार आहेत.
1982 मध्ये डॉक्टर एन.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेला क.भा.पा.महाविद्यालयाचा मानसशास्त्र विभाग आज पीएच.डी.संशोधनाचे नामांकित केंद्र बनले असून, ग्रामीण व शहरी मानसिक आरोग्य क्षेत्रात ठसा उमटवला आहे. विभागातील 7 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली असून 13 जण सध्या संशोधन करत आहेत. मानसशास्त्र विभाग आणि नॅशनल युनिव्हर्सिटी,फिलिपिन्स यांच्यात उच्च शिक्षण,संशोधन, मानसिक आरोग्य, स्त्री सबलीकरण, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या क्षेत्रांत शैक्षणिक देवाणघेवाण व संयुक्त उपक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झाला आहे. या करारात डॉक्टर मिलिंद देशमुख यांचे महत्वपूर्ण योगदान असून,येत्या वर्षात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जागतिकस्तरावर शिक्षण व संशोधनाच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत.याचाच फायदा हा महाविद्यालयांतील संशोधन केंद्र मंजूर होण्याकरीता झालेला असून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले मानसशास्त्र संशोधन केंद्र म्हणजेच सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण तसेच प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील विधी महाविद्यालय आणि डॉक्टर एन.डी.पाटील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रोहित पवार, संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाले.यावेळी भाषण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,पैसे तर सगळे कमावतात मात्र ते देण्याची दानत हि फक्त रामशेठ ठाकूर यांच्या मध्येच आहे असे त्यामुळे मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्यावतीने त्यांचे आभार मानतो असे म्हणाले तर संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील यांनीही रामशेठ ठाकूर म्हणजे हिरा आहेत.गव्हाण गावातील एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला.त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कमवा आणि शिका हा मंत्र घेऊन शिक्षण पूर्ण केले तसचे पुढे ते मोठे उद्योजक झाले.त्यांचे व्यक्तिमत्व हे अत्यंत प्रामाणिक,प्रेमळ आणि दयाळू असून त्यांनी 100 कोटीहून अधिक रूपये संस्थेला संस्थेला दिले आहे.त्यामुळे रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेला लाभलेले रत्न आहेत, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही भाषण करणात म्हणाले की. डॉक्टर एन.डी. पाटील आणि सरोज पाटील यांनी माझ्यावर भरपूर प्रेम केले असून रयत शिक्षण संस्था हि माझी मातृसंस्था आहे. त्यामुळे संस्थेला जी काही मदत लागेल ती मी सर्वोतोपरी करेल असा शब्द दिला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री चंद्रकांत पाटील,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील माने,आमदार जयंतराव पाटील,रोहित पवार, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य,आशिष देशमुख, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर डी.टी.शिर्के, शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर,सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे,पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव,महेश चोथे यांच्यासह विविध स्थैर्यातील क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थिती होते.
Post a Comment