इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटलीमध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन ... उरणमधील प्रभात कोळी या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणार ..माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आर्शिवाद घेतले
पनवेल - इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटलीमध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे.१३ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान ही स्पर्धा इटलीतील मोलवेनो शहरात होणार असून उरणमधील प्रभात कोळी हा या स्पर्धेत देशाचे प्रतिनीधित्व करणार आहे.याबद्दल त्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आज (दि. ३१) सदिच्छा भेट घेऊन आर्शिवाद घेतले.यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभातला पुष्पगुच्छ देऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते वसंतशेठ पाटील,राजू रघूनाथ कोळी उपस्थित होते.
Post a Comment