News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नववर्ष स्वागत पार्ट्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष ...३१ डिसेंबरला पोलिसांचा चोख बंदोबस्त

नववर्ष स्वागत पार्ट्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष ...३१ डिसेंबरला पोलिसांचा चोख बंदोबस्त

पनवेल दि.३०(वार्ताहर):-  नववर्षाचे स्वागत करीत असताना थर्टीफर्स्टच्या रात्री शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील हॉटेल,बार,ऑर्केस्ट्रा बार,रेस्टॉरंट, परमिट रुम त्याचप्रमाणे फार्महाऊस,बंगले,समुद्र किनाऱ्यांवर होणाऱ्या नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांवर
विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यासाठी अडीच हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी, त्याशिवाय वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.यात ३ पोलिस उपायुक्त, ६ सहाय्यक पोलिस आयुक्त,५० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षक, २०० सहाय्यक पोलीस निरीक्षक-पोलीस उपनिरीक्षक त्याचप्रमाणे १७०० पेक्षा अधिक पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे परिमंडळ स्तरावर आणि वाहतूक विभागाकडून शहराच्या प्रवेशद्वारावर, मुख्य चौकात, नाकाबंदी, गस्त, फिक्स पाँईट, तसेच निर्जन स्थळी चेकिंगचे पॉईंट लावण्यात येणार आहेत. नवी मुंबईत परिमंडळ स्तरावर ठेवण्यात आलेल्या बंदोबस्तावर पोलिस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग स्तरावरुन देखरेख करणार आहेत. सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सागरी किनाऱ्यांवरदेखील पोलिसांचा विशेष  बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.अमली पदार्थांचे व विनापरवाना मद्य, परदेशी मद्य पिणाऱ्यांवरदेखील असे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलींद भारंबे यांनी सांगितले आहे. बेवारस वस्तू, संशयित व्यक्ती,संशयित वाहने,मुलींची छेड काढणारे,अफवा पसरविणारे आदींची माहिती देण्यासाठी ११२ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलिस आयुक्तांनी केले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरात असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट व फार्म हाऊस तसेच बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्या व रेव्ह पार्ट्या होतात.त्यात अमली पदार्थांचा वापर होतो. त्यामुळे अशा पार्ट्यांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.या संदर्भात पनवेल परिसरातील ७० फार्महाऊस आणि ८ रिसॉर्टला मालकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलाय आहेत. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment