पनवेलमधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं कमर्शियल लँडिंग ...एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेने हे विमानतळ सुरू होण्याची शक्यता? लँडिंगमुळे विमानतळाची कार्यक्षमता आणि विश्वास वाढला
पनवेल- पनवेलमधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं कमर्शियल लँडिंग इंडिगो विमानाने आज यशस्वीपणे पूर्ण केले,जे एक नवी मुंबईकरांसाठी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण आहे.हा टप्पा नवी मुंबईच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वाचा बदल दर्शवितो.यामुळे नवी मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटीला एक नवा वेग मिळेल,तसेच प्रवाशांसाठी नवीन संधी निर्माण होतील.साधारण एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेने हे विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे.इंडिगोच्या या लँडिंगमुळे विमानतळाची कार्यक्षमता आणि विश्वास आणखी वाढला आहे.नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मजबूत होईल आणि भविष्यात अनेक नवीन उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.हे नवी मुंबईसाठी एक ऐतिहासिक आणि गर्वाचा क्षण आहे.
Post a Comment