योगिनी वैदू यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
पनवेल - जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील तळोजे पाचनद शाळेतील शिक्षिका योगिनी वैदू यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर योगिनी वैदू यांचे सर्वचस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर करण्यात आले आहेत.२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी रायगड जिल्ह्यातील १७ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे,यामध्ये पनवेल तालुक्यातून योगिनी वैदू यांची ही निवड करण्यात आली आहे.पनवेल तालुक्यातील नेरे भानघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये योगीनी वैदू यांनी शैक्षणिक सेवा केली आहे.
शिक्षक ह्या पदावर कार्यरत असताना कमी पटाची शाळा बंद होवू नये ह्या करिता भानघर गावातील ग्रामस्थांचं सहकार्य घेवून शाळेचा पट वाढवला व शाळा नावारूपाला आली.शाळेच्या प्रगतीचे श्रेय ते ग्रामस्थांना देतात.याव्यतिरिक्त इतर सामाजिक क्षेत्रातही सक्रिय राहून अनेक गरजवंत विद्यार्थी यांना शालयपयोगी वस्तू विविध संस्थाकडून मिळवून देणे,वृद्धाश्रमाकरिता सहकार्य, महिलांना मार्गदर्शन करणे त्यांना शक्य झाले कारण त्या स्वतः लायन्स क्लबच्या प्रेसिडन्स आणि सेक्रेटरी घ्या पदावर कार्यरत होत्या... सेंटीनरी स्टील मार्केट, पनवेल क्लबच्या 2020 मध्ये अध्यक्ष म्हणून काम केले.राज्यस्तरीय बालरक्षक चळवळीमध्ये सक्रिय आहेत.शाळाबाह्य मुलांसाठी अनेक यशस्वी प्रयत्न केले आहेत.
Post a Comment