तळोजा आणि खारघर परिसरात दहशत पसरविणारा गुंड तडीपार ....परिमंडल १ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची कारवाई ... निर्णयाचे तळोजा गाव आणि परिसरातील नागरिकांकडून स्वागत
पनवेल - तळोजा आणि खारघर परिसरात दहशत पसरवून सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माँण करणारा गुंड मन्सूर इब्राहिम पटेलला (वय ५२ ) नवी मुंबई पोलिसांनी हद्दपार केले आहे.परिमंडल १ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी नुकतीच ही कारवाई केली.मन्सूर पटेलवर नवी मुंबईत वेगवेगळ्या प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत.
रस्त्यात अडवून मारहाण करणे,मासळी बाजारात दहशत निर्माँण करणे,चाकूने मारहाण करून जिवितास हानी पोहचविणे आदी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे तळोजा येथील रहिवाशी मन्सूर इब्राहिम पटेल (वय ५२) याच्यावर गुन्हे दाखल आहेत.किरकोळ कारणावरून तळोजा गावात वाद निर्मांण केल्यामुळे मन्सूर पटेलवर तळोजा पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत.तीन गुन्हे दाखल असतानाही गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होत नसल्यामुळे २३ ऑगस्ट २०२३ रोजी तळोजा पोलिसांनी सीआरपीसी कलम १०७ अंतर्गंत चँप्टर केसचा प्रस्ताव सादर केला होता.यात १५ हजार रूपयांच्या जामिनदारासह जात मुचलका बंधपत्र घेण्यात आले. परंतू याच कालावधीत मन्सूर शांत राहिला नाही.दरम्यान तळोजा पोलिस ठाण्यात पुन्हा दखलपात्र गुन्हा झाला.संबंधीत व्यक्ती सर्वसामान्यांना नाहक त्रास देवून वारंवार वाद घालतो. ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याचे सांगितले. या तक्रारींची गंभीर दखल घेवून नवी मुंबई पोलिसांनी या गुंडाची दहशत संपविण्यासाठी पुढचे पाऊल टाकले.नवी मुंबईतून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेतला.एवढेच नव्हे तर नवी मुंबईच्या बाहेर राहणाऱ्या परिसरातील पोलिस ठाण्यात दर आठवड्याला हजेरी लावण्याची ताकीद या गुंडाला दिली आहे.नवी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाचे तळोजा गाव आणि परिसरातील नागरिकांना स्वागत केले असून पोलिसांचे आभार मानले आहेत.
Post a Comment