लायन्स क्लब पनवेलच्या अध्यक्षपदी सुरभी पेंडसे
पनवेल - लायन्स क्लब पनवेलच्या अध्यक्षपदी सुरभी पेंडसे यांची निवड झाली तर लिओ क्लब पनवेलच्या प्रेसिडेंट लिओ आरुषी गोडबोले आणि लिओ क्लब पनवेल लुमिना क्लबच्या प्रेसिडेंट लिओ अनिका पोद्दार यांची निवड झाली आहे.
लायन्स क्लब पनवेलचा 61 वा शपथविधी समारंभ गोखले हॉल,पनवेल येथे संपन्न झाला.या समारंभात लायन सुरभी पेंडसे यांची 2025-2026 या वर्षासाठी लायन्स क्लब पनवेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमासाठी इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून MJF लायन मुकेश तनेजा उपस्थित होते तर इंडक्शन ऑफिसर म्हणून फर्स्ट VDG इलेक्ट लायन प्रविण सरनाईक आणि डिस्ट्रिक्ट लिओ प्रेसिडेंट लिओ रक्षण खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समारंभात 8 नवीन सदस्यांचे औपचारिक स्वागत करून त्यांना लायन्स क्लबमध्ये समाविष्ट करण्यात आले.यासोबतच नवीन Cubs Club ची स्थापना आणि Campus Club ची अधिकृत घोषणा करण्यात आली.
लायन्स क्लब पनवेल येत्या वर्षभरात चेक डॅम प्रकल्प,ज्ञानगंगा एज्युकेशनल फेअर,फंड राईजिंग ड्राईव्ह, गुरुपौर्णिमा उत्सव,डॉक्टर्स डे,हेल्थ कॅम्प,आई चेकअप कॅम्प यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करणार आहे.
कार्यक्रमात एक युनिक स्पॉट अॅक्टिव्हिटी म्हणून समाजाची गरज ओळखून मरच्युरी फ्रीझर डोनेट करण्यात आला.या उपक्रमासाठी लायन पीएमजेएस संजय पोद्दार यांनी आर्थिक योगदान दिले.
Post a Comment