News Breaking
Live
wb_sunny Jul, 4 2025

Breaking News

पनवेल महानगरपालिकेचा 'एक शहर एक ॲप'पनवेल कनेक्ट ॲप ...... नागरिकांचे प्रश्न आणि सेवेसाठी आता २४ तास उपलब्ध असणार 8960916091 मोबाईल क्रमांक

पनवेल महानगरपालिकेचा 'एक शहर एक ॲप'पनवेल कनेक्ट ॲप ...... नागरिकांचे प्रश्न आणि सेवेसाठी आता २४ तास उपलब्ध असणार 8960916091 मोबाईल क्रमांक

पनवेल: पनवेल महानगरपालिका ही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना सेवा देण्यामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच दृष्टिकोनातून  ईज ऑफ डूंइंग लिव्हिंग(‘Ease of Doing Living’) या संकल्पनेला पुढे नेत,आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त कैलास गावडे व स्वरूप खारगे यांच्या नियंत्रणाखाली पालिकेने 'पनवेल कनेक्ट'(Panvel Connect) हे मोबाईल अॅडप तयार केले आहे.यामध्ये विविध सोयी सुविधासह चॅटबोटचा वापर करून नागरिकांना 24/7 सहाय्य उपलब्ध असणार आहे.यासाठी महापालिकेने 8960916091 या मोबाईल क्रमांक जाहिर केला आहे.
हे अॅप नागरिक व महापालिका यांच्यातील संवादाची दरी मिटवत एक डिजिटल ब्रिज म्हणून कार्य करणार आहे. ‘पनवेल कनेक्ट’( Panvel Connect) ॲप नागरिकांनी डाऊनलोड केल्यास नागरिकांना घरबसल्या सेवा मिळवणे, प्रमाणपत्रे,परवानग्या मिळवणे,तक्रार निवारण करणे आणि शासकीय उपक्रमांची माहिती मिळवणे हे सर्व या एकाच अॅपवर शक्य होणार आहे. 
पनवेल कनेक्ट अॅ प हे केवळ मोबाईल अॅप नाही,तर नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण केलेले एक प्रभावी व्यासपीठ आहे. हे अॅ प पनवेल शहराच्या डिजिटल परिवर्तनाचे आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने उचललेले एक भक्कम पाऊल आहे.

हे ॲप महानगरपालिकेच्या लोकाभिमुख उपक्रमांची माहिती वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचवली जाऊन नागरीकांच्या सहभागाने शहर विकासात योगदान मिळण्यास हातभार लागून गरजेच्या वेळी नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी हे अॅप एक उत्तम व्यासपीठ म्हणून काम करेल. 
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या अॅपमध्ये SOS आपत्कालिन सुविधा आणि निर्भया कक्षाशी संपर्क थेट जोडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या विविध महिला सक्षमीकरण योजना पनवेल महानगर पालिका क्षेत्रातल्या सर्व महिलापर्यंत पोचवण्याचे महत्वाचे कार्य हे अॅप करणार आहे. 

शहरातील सर्व खाजगी कंपनींची नोंद घेऊन गरजू युवा व नागरिकांसाठी या अॅपच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात अनेक रोजगार निर्मिती संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील नागरिकांच्या सोशल मीडिया, पत्र, ईमेल अश्या विविध माध्यमा द्वारे येणाऱ्या समस्या व प्रश्न यासाठी या अॅप मार्फत तक्रार निवारण प्रणालीचा वापर करून सोडवल्या जाणार आहेत. यामध्ये किती तक्रारी आल्या व त्यावर कोणती कार्यवाही केली आणि किती प्रलंबित आहेत, या सर्व तक्रारी संबंधित अहवाल व डॅशबोर्ड  आयुक्त यांच्या देखरेखेखाली असणार आहे.
 पनवेल कनेक्ट अॅपचा वापर करून माहिती संकलन करणे, महाराष्ट्र लोकसेवा हमी हक्क कायदा-2015 अंतर्गत ऑनलाइन सेवांचा अर्ज करणे, महानगरपालिका कर्मचारी यांच्यासाठी विविध सुविधा, तसेच चालू घडामोडींवर वेबिनार, ब्लॉग्स उपलब्ध होणार आहेतच पण यासोबतच चॅटबोटचा वापर करून सदर अॅपद्वारे नागरिकांना 24/7 सहाय्य उपलब्ध असणार आहे. यासाठी महापालिकेने 8960916091 या मोबाईल क्रमांक जाहिर केला आहे. ज्यामुळे नागरिकांचे प्रश्न आणि सेवा, विनंती यांचे त्वरित समाधान होण्यास मदत होणार आहे. सदर अॅपद्वारे जीपीएसच्या माध्यमातून स्थानिक नागरिक तसेच पर्यटक व स्थलांतरित रहिवाशांसाठी पनवेल महानगर पालिका हद्दीतील जवळची सरकारी कार्यालये, रुग्णालये, शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच रक्तपेढ्या, उद्याने सुलभतेने शोधता येणार आहेत. 

चौकट
पनवेल कनेक्ट ॲपवरील महत्वाच्या सुविधा:
1.महिलांची सुरक्षा: SOS सुविधा व निर्भया कक्षाशी थेट संपर्क
2.महिला सक्षमीकरण: राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती व उपलब्धता
3.रोजगार संधी: खाजगी कंपन्यांची माहिती व रोजगार उपलब्धतेसाठी प्लॅटफॉर्म
4.तक्रार निवारण: तक्रारी नोंदवणे, त्यावरची कारवाई व अहवालांचे डॅशबोर्डवर परीक्षण
5.संपूर्ण माहितीचा अॅ्क्सेस: GPS द्वारे जवळची शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, उद्याने, स्वच्छतागृहे व रक्तपेढ्या शोधता येणार
6.२४x७ सहाय्य: चॅटबोटच्या माध्यमातून त्वरित सेवा व मार्गदर्शन
7.महत्वाच्या घडामोडी: वेबिनार, ब्लॉग्स, व शासकीय घडामोडींची नियमित माहिती

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment