पनवेल महापालिकेच्यावतीने एका दिवसातच थकबाकीदारांच्या १२ मालमत्तावर अटकावणीची कारवाई .... केवळ एका दिवसात तब्बल ४ कोटी ६६ लाखाची वसुली
पनवेल : पनवेल महापालिकेच्यावतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता अटकावणी मोहीमेस जोमाने सुरूवात केली आहे. मार्च महिना सुरू झाल्यापासून मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यास वेग आला असून आजच्या एका दिवसात तब्बल मालमत्तांवर अटकावणी कारवाई करण्यात आली आहे.आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानूसार उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधोत पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन व कर आकारणी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध जप्ती व अटकावणी पथकाच्या माध्यमातून वेगाने कारवाई केली जात असून,दररोज कोटीच्या घरामध्ये मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशनुसार आज दिनांक 06 मार्च रोजी मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवरती प्रत्येक विभागातील वसुली पथकाने कारवाई केली असून यामध्ये खारघरमधील भारती विद्यापीठ,प्राईम मॉल,द पॅसिफिक अपार्टंमेंट,कळंबोलीमधील बेस्ट रोडवेज कंपनी आणि तळोजामधील वेदान्त इंटरमिडीएट प्राइवेट लिमिटेड यांच्यासह 12 मालमत्तांवर अटकावणी कारवाई करण्यात आली आहे.
कर अधिक्षक महेश गायकवाड तसेच कर अधिक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली जप्ती कारवाई व वसुली कारवाईसाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. अटकावणी कारवाई अधिक तीव्र केल्यामुळे मालमत्ता कर भरण्याकडे मालमत्ताधारकांचा कल वाढू लागला आहे. आजच्या एका दिवसात महापालिकेच्या तिजोरीत 4 कोटी 66 लाखाची भर पडली आहे तर या आर्थिक वर्षात एकूण 347 कोटी 82 लाखाची वसुली करण्यात आली आहे.
‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी लवकरात लकवर आपला मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करून जप्ती सारखी कटू कारवाई टाळावी असे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.
Post a Comment