News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मराठीबद्दल वादग्रस्त विधान ... महाविकास आघाडीच्यावतीने भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ पनवेलमध्ये आंदोलन

मराठीबद्दल वादग्रस्त विधान ... महाविकास आघाडीच्यावतीने भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ पनवेलमध्ये आंदोलन

पनवेल -प्रतिनिधी :- महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान मराठी भाषेच्या विरोधात मुंबई,महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची नाही असे वक्तव्य करून मराठी माणसाचा अपमान करणारे आरएसएसचे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार व पनवेल उरण महाविकास आघाडी अध्यक्ष बाळाराम पाटील,कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील,महानगरप्रमुख अवचित राऊत,तालुकाप्रमुख संदीप तांडेल,शेकापचे गणेश कडू,कॉंग्रेसचे हेमराज म्हात्रे,नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख,खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के,कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी,खारघर शहरप्रमुख गुरु म्हात्रे,महिला उपजिल्हा संघटिका सौ.रेवती सकपाळ,तालुका संघटिका सौ.अनीता डांगरकर,उपमहानगर संघटिका सौ.संचिता राणे, खरघर शहर संघटिका सौ.संपदा धोंगडे,कामोठे शहर संघटिका सौ.संगीता राऊत, सौ.उज्वला गावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment