बोगस डॉक्टरांच्या विरोधात पनवेल महानगरपालिका ॲक्शन मोडवर...आयुक्तांनी कारवाई करण्याचे दिले निर्देश
पनवेल, : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याकरिता आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या सुचनेनुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली समाज केंद्र कामोठे येथे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक म्हणजेच जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली .
सदर बैठकीस पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर कामोठे कळंबोली खांदा कॉलनी पनवेल येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचे अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीमध्ये माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी बोगस डॉक्टर वर कारवाई करणे व बोगस डॉक्टर शोध मोहीम याविषयी शासनाच्या आरोग्यसेवा आयुक्तालय कार्यालयाकडून आलेले सूचनेसंबंधी माहिती देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्याकरिता पालिका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीचे अध्यक्ष माननीय आयुक्त पनवेल महानगरपालिका व सचिव म्हणून वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. पालिका स्तरावरील समिती अंतर्गत प्रभाग निहाय क्षेत्रीय समिती गठीत करण्यात आली असून या समिती मध्ये प्रभाग अधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक अणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती त्या त्या क्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या दवाखान्यात भेटी देऊन,वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रमाणपत्राची तपासणी करणार आहेत. तपासणी चा अहवाल पालिका स्तरावरील समितीकडे पाठवणार आहेत.पालिका स्तरावरील समितीकडे बोगस डॉक्टर आढळून आल्यास क्षेत्रीय समिती संबंधित बोगस डॉक्टरवर गुन्हा नोंद करणार आहे.सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी यांना योग्य माहिती देण्यात यावी असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी केले आहे.सदर बैठकीस पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पंडित अणि डॉ.मनीषा चांडक व स्वछता निरीक्षक योगेश कस्तुरे उपस्थित होते.
शासन निर्णय ....
बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधून काढण्यासाठी शासन निर्णयअन्वये जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच नगरपालिका व महानगरपालिकास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समित्यांकडून सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या दवाखान्यात भेटी देऊन वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रमाणपत्राची तपासणी करून, तपासणीचा अहवाल पालिका स्तरावरील समितीकडे पाठवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
Post a Comment