शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील व आस्वाद पाटील यांचा भाजपात प्रवेश .... रायगड जिल्हा शत प्रतिशत भाजपामय होणार - महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण
मुंबई - भाजपाचा विकासाभिमुख दृष्टिकोन,पारदर्शक नेतृत्व व जनतेच्या भावनांना प्रतिसाद देणारे धोरण पाहता,अनेक नेते व कार्यकर्ते भाजपात विश्वासाने प्रवेश करत आहेत. महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील व श्री.आस्वाद पाटील यांनी मुंबईत भाजपा कार्यालयात भाजपात आज प्रवेश केला.यावेळी त्यांचे पक्षात स्वागत केले.रायगड जिल्हा शत प्रतिशत भाजपामय होणार असल्याचा विश्वास यावेळी रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
प्रसंगी खासदार धैर्यशील पाटील,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी,आमदार विक्रांत पाटील व उत्तर रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित होते.
Post a Comment