कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या घरी परदेशी पाहुण्यांची भेट.!
पनवेल -कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या घरी परदेशी पाहुण्यांनी त्यांच्या राहत्या शेलघर येथील घरी भेट घेतली.सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न मार्गी लावत असतांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवत १७० देशांतील इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फ्रेडरेशन लंडन या बहुराष्ट्रीय संघावरील कार्यकारीणीमधे एक्झीक्युटिव बोर्ड मेंबरपर्यंत मजल मारणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची ख्याती आता सर्वदूर पसरली आहे. महेंद्रशेठ घरत नेतृत्व करत असलेल्या न्यु मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची ख्याती आता सातासमुद्रापार पसरली आहे. परदेशातून ITF चे पदाधिकारी भारतामधे आले कि ते आवर्जून महेंद्रशेठ घरत यांची भेट घेतात.ITF या बहुराष्ट्रीय संघाचे एशिया पॅसिफिक सेक्रेटरी स्कॉट (ऑस्ट्रेलिया ) डॉक विभागाचे सेक्रेटरी एनरीको (UK) एक्झीक्युटिव बोर्ड मेंबर शिवगोपाळ मिश्रा (दिल्ली) डॉकर्स विभागाचे राजा श्रीधर (तामिळनाडू) ह्यांनी सुखकर्ता निवास स्थानी महेंद्र घरत यांची सदिच्छा भेट घेऊन भारतीय कामगारांच्या समस्यांवर चर्चा केली.यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी महाराष्ट्रीयन संस्कृती प्रमाणे शॉल,पुष्पगुच्छ व गणेशाची मूर्ती भेट देऊन पाहुण्यांचे आदरातिथ्य केले.याप्रसंगी त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत,संघटनेचे कार्याध्यक्ष पि.के. रमण,सरचिटणीस वैभव पाटील उपस्थित होते.
Post a Comment