नव्या मुंबईतील नेरूळच्या आगरी-कोळी भवनामध्ये उद्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ... महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत
पनवेल - नुकताच झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि.१ जुलै २०२४ रोजी म्हणजेच उद्या आगरी कोळी संस्कृती भवन,सेक्टर-२४,नेरुळ (पश्चिम),नवी मुंबई येथे होणार आहे.या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली असून उद्याच्या मतमोजणीत कोण बाजी मारतय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोंकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले आहे.मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर मतदार होते..त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ ६४.१४% मतदान झाले.ठाणे- ५८.४२%, पालघर- ६३.२३%, रायगड- ६७.५९%, रत्नागिरी-६९.१४%, सिंधुदूर्ग- ७९.८४% एकूण- ६४.१४% मतदान झाले आहे.
Post a Comment