एकच मुलगी ... एकच अपत्य ... असणाऱ्या आई-वडिलांचा खारघरमध्ये सन्मान .... खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पनवेल जिल्हा महिला आघाडीचा उपक्रम
खारघर - एकच मुलगी ... एकच अपत्य ... असणाऱ्या आई-वडिलांचा खारघरमध्ये खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पनवेल जिल्हा महिला आघाडीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
ज्यांनी एका मुलीच्या जन्मानंतर तिलाच आपल्या वंशाचा दिवा मानून दुसरे अपत्य होऊ दिले नाही हा समाजासमोर एक आदर्श ठेवला अशा आई- वडीलांचा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी महिला जिल्हाध्यक्षा राजश्री कदम,राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते,युवक,महिला उपस्थित होते.अशा एकच मुलगी अपत्य असणाऱ्या समाजातील इतर परिवारांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी असा मुख्य उद्देश या कार्यक्रमा मागचा होता.
Post a Comment