इन्स्टाग्राम मैत्री .... ते अश्लील फोटो ....अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल,तरुणाचा खांदेश्वर पोलिसांकडून शोध सुरू
पनवेल (वार्ताहर)' ः ऑबेराय नामक तरुणाने नवीन पनवेल भागात राहणार्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री करून तिला अश्लील फोटो पाठविण्यास भाग पाडून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरोधात विनयभंग,पोक्सो तसेच आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकणातील 16 वर्षीय पीडित मुलगी नवीन पनवेल भागात राहण्यास असून, ती सध्या शिक्षण घेत आहे. पीडित मुलीचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे. याचाच फायदा उचलत गेल्या मे महिन्यात ऑबेराय नामक तरुणाने पीडित मुलीसोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत भावनिक संवाद साधून तिचे अश्लील फोटो पाठवण्यास भाग पाडले.त्यामुळे पीडित मुलीने आपले काही अश्लील फोटो ऑबेराय याला पाठवून दिले होते.ऑबेराय याने पीडित मुलीच्या मात्र त्यानंतर आरोपी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तसेच सोशल मीडियावरून तिचा सतत पाठलाग सुरू केला. त्यानंतर त्याने पीडित मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली.या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली.पालकांनी तत्काळ खांदेश्वर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ऑबेरॉय नामक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
Post a Comment