मुंबई-गोवा महामार्गाचा लढा तीव्र करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची निर्धार व निर्णायक सभा....महामार्ग अद्यापही पूर्ण होण्याची चिन्ह नाहीत
पनवेल - मुंबई-गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नसून आता हा लढा तीव्र करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने निर्धार व निर्णायक सभेचे आयोजन केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील सतरा वर्षापासून चालू असून अद्यापही पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नाहीत.कोकणातील सर्व संघटना आपापल्यापरीने आंदोलनाच्या माध्यमातून लढा लढत आहेत,त्यात काही अंशी निकाल देखील सकारात्मक आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत.अद्यापही अनेक ठिकाणी काम अर्धवट असून कोकणकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे.यासाठीच कोकणातील सर्व संघटनांना सोबत घेऊन जनआक्रोश समितीच्या अंतर्गत ही परिस्थिती लवकरात लवकर कशी संपुष्टात येईल व कोकणकरांचा प्रवास सुरक्षितच सुखकर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.यापुढील लढा तीव्र करण्यासाठी सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य गरजेचे असून शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय,सुरेंद्र गावस्कर सभागृह,शारदा सिनेमाच्या बाजूला,दादर-मुंबई येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Post a Comment