स्व.पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती समितीतर्फे जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा ...
पनवेल - आई आधार केंद्र आयोजित स्वर्गीय पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती समितीतर्फे जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरची वक्तृत्व स्पर्धा ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी येथील नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुरुवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात होणार आहे.सदरची स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपूरती मर्यादित आहे. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी व ८वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.प्रत्येक शाळेतील प्रत्येक गटातून दोन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये इतके राहील.
५ वी ते ७ वी व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी १) घरात आई ...शाळेत बाई २) मला पडलेले सुंदर स्वप्न .. ३) आवडते मज मनापासून शाळा ४) माझे कोकण ..सुंदर कोकण ५ ) मला खेळाडू व्हायचंय ..असे स्पर्धेचे विषय आहेत तर ८ वी ते १० वी वयोगटासाठी १) इंटरनेट दूरचे जवळ की जवळचे दूर २) मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ३) योगा असे जेथे आरोग्य तेथे वसे ४) संस्काराची विद्यापीठे हरवलीत का? ५) पुस्तकप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...असे विषय असून रोख रक्कम व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. सदरची पारितोषिक ही दोन्ही गटासाठी असतील.
अधिक माहितीसाठी विनोद मिरगुळे- 9970953600, 8668810177, महेंद्र पवार - 8149184864 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वासुदेव शंकर तुळसणकर यांनी केले आहे.
Post a Comment