अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी
पनवेल -अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत असून तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार बुधवार दि.26 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.या बाबीचा विचार करता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक- माध्यमिक शाळा,जिल्हा परिषद शाळा,नगरपालिका,अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
Post a Comment