News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कोकण रेल्वेच्या १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाच्या कामांचे उद्या मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार भूमिपूजन

कोकण रेल्वेच्या १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाच्या कामांचे उद्या मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार भूमिपूजन

मुंबई  - रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण १२ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रीटकरण व सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन मंगळवार दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार, तसेच केंद्रीय मंत्री सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
खासदार विनायक राऊत,आमदार, निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी या उपस्थित राहणार आहेत. 
 
कोकण विभाग सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, रत्नाकगिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे छाया नाईक, कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधियता अजय कुमार सर्वगोड, वैभवाडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक जोशी यांनी कळविले आहे. 

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण १२ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रीटकरण व सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन होणार आहे.कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता  सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले आहे.त्यासाठी सामंजस्य करार कोकण रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनामध्ये उपमुख्यमंत्री  फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.

कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानक वीर, माणगाव व कोलाड. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण,रत्नागिरी, संगमेश्वर,राजापूर व खेड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी. या कामांना राज्य शासनामार्फत मंजूरी प्रदान केली असून सन मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये 12 कामांकरिता 56.25 कोटी इतक्या रक्कमेच्या कामांचा समावेश करण्यात आला असून आजमितीस या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येत आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment