कवी केशवसुत स्मारक,मालगुंड येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा ... उद्या सकाळी होणाऱ्या सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
रत्नागिरी - महाराष्ट्र शासन,मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक,मालगुंड येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालन उद्घाटन सोहळा रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या लोकार्पण कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग,मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते तर विशेष उपस्थिती गृहराज्यमंत्री योगेश कदम त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे,खासदार सुनील तटकरे,विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे प्रसाद लाड,ज्ञानेश्वर म्हात्रे,विधानसभा सदस्य भास्कर जाधव,किरण सामंत,शेखर निकम,त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रमुख विश्वस्त रमेश कीर त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी एम.देवेंद्रर सिंह,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे,जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
निमंत्रक कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर,कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ,मराठी भाषा विभागाचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे,कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील,सरपंच श्वेता खेऊर यांनी ही माहिती दिली.
Post a Comment