News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सिद्धार्थ उरणकर यांची अमेरिकेत भरारी;सॉफ्टवेअर अभियांत्रिकी अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश; उद्योजक संतोष उरणकर यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

सिद्धार्थ उरणकर यांची अमेरिकेत भरारी;सॉफ्टवेअर अभियांत्रिकी अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश; उद्योजक संतोष उरणकर यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

पनवेल (वार्ताहर) : जिद्द, मेहनत आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणाच्या जोरावर सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत सिद्धार्थ जगदीश उरणकर यांनी अमेरिकेत उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले आहे. माजी नगरसेवक तथा उद्योजक संतोष हिरामण उरणकर यांचे पुतणे आणि वकील अॅड. जगदीश नारायण उरणकर यांचे सुपुत्र सिद्धार्थ यांनी अमेरिकेतील विद्यापीठात सॉफ्टवेअर अभियांत्रिकी अभ्यासक्रमात ९६.७६ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे उरणकर कुटुंबीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

परदेशात शिक्षण घेताना अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि ध्येय गाठण्याची जिद्द यांच्या जोरावर सिद्धार्थ यांनी हे यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीने केवळ कुटुंबीयांनाच नव्हे, तर नातेवाईक आणि परिचितांनाही आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण दिला आहे.एका तरुणाने आपल्या कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीयस्तरावर मिळवलेले हे यश कुटुंबासाठी विशेष अभिमानास्पद ठरले आहे.

“सिद्धार्थने मिळवलेले यश हे त्याच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फळ आहे. त्याने अमेरिकेतील विद्यापीठात सुवर्णपदक मिळवून संपूर्ण उरणकर कुटुंबाचा गौरव वाढवला आहे. त्याच्या या यशाचा आम्हाला मनस्वी अभिमान आणि आनंद आहे,” अशा भावना उद्योजक संतोष उरणकर यांनी व्यक्त केल्या.

सिद्धार्थ यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ही भरारी नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment