News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ओरायन मॉलच्या ‘शॉप अँड वीन २०२६’चा लकी ड्रॉमध्ये सुहास खुलपकर ठरले भाग्यवान विजेते....पनवेलकरांना खरेदीसोबतच मनोरंजनाचेही हक्काचे ठिकाण- अभिनेते सुनील बर्वे

ओरायन मॉलच्या ‘शॉप अँड वीन २०२६’चा लकी ड्रॉमध्ये सुहास खुलपकर ठरले भाग्यवान विजेते....पनवेलकरांना खरेदीसोबतच मनोरंजनाचेही हक्काचे ठिकाण- अभिनेते सुनील बर्वे

पनवेल : मराठी माणसाने केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात उतरले पाहिजे.समाजात जास्तीत जास्त मराठी उद्योजक घडण्याची आज गरज आहे,असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांनी केले.पनवेल येथील ओरायन मॉलच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शॉप अँड वीन २०२६’ या ग्राहकांसाठीच्या लकी ड्रॉ स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा बर्वे यांच्या हस्ते करण्यात आली.या स्पर्धेत सुहास खुलपकर हे भाग्यवान विजेते ठरले असून त्यांना येझडी अ‍ॅडव्हेंचर बाईक बक्षीस म्हणून मिळाली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २८ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ओरायन मॉलमध्ये पाच हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही विशेष लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.खरेदीदारांना यासाठी लकी ड्रॉ कूपन देण्यात आले होते.२२ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेची सोडत काढण्यात आली.यावेळी सुनील बर्वे यांनी स्वतः चिठ्ठी काढून विजेत्याचे नाव जाहीर केले.विशेष म्हणजे,त्यांनी स्वतः दूरध्वनीद्वारे सुहास खुलपकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना विजेते ठरल्याची आनंदाची बातमी दिली.

यावेळी सुनील बर्वे यांनी ओरायन मॉलच्या यशस्वी वाटचालीचे भरभरून कौतुक केले.मंगेश परुळेकर यांच्यासारख्या मराठी उद्योजकांनी मॉलसारख्या मोठ्या व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी स्थान निर्माण केले,ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.पनवेलकरांना खरेदीसोबतच मनोरंजनाचेही हक्काचे ठिकाण ओरायन मॉलने उपलब्ध करून दिले आहे,असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

ओरायन मॉलला यंदा दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच मॉलच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला मॉलचे व्यवस्थापन, कर्मचारीवर्ग तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.‘शॉप अँड वीन २०२६’च्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीसोबत आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment