News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेचा दशकपूर्ती महोत्सव ...पनवेल महानगरपालिकेने अधिकाधिक लोकाभिमुख कारभार करावा - महापौर नितीन पाटील

पनवेल महानगरपालिकेचा दशकपूर्ती महोत्सव ...पनवेल महानगरपालिकेने अधिकाधिक लोकाभिमुख कारभार करावा - महापौर नितीन पाटील

पनवेल : पनवेल महानगरपालिकेने अधिकाधिक लोकाभिमुख कारभार करावा,ज्यायोगे नागरिकांना अधिकाधिक सोयी सुविधा व समाधान मिळेल असे प्रतिपादन महापौर नितिन पाटील यांनी केले.पनवेल
महापालिकेच्या वर्धापन दिन तथा दशकपूर्ती महोत्सव प्रारंभानिमित्त मुख्यालयात आयोजित करण्यात स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आयुक्त मंगेश चितळे,उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम,महिला बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा,नगरसेवक तसेच अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे,अतिरीक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेल नगरपरिषदेचे  पनवेल महानगरपालिकेत रूपांतर होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी जे अथक प्रयत्न केले त्यांचा उल्लेख करून आमदार महोदयांचे आभार मानले.

 महानगरपालिकेत आल्यानंतर अभ्यागतांना हि पालिका आपली वाटेल व त्यांचे काम सहजतेने होईल याकडे प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे असे सांगितले. अधिकारी व पदाधिकारी यांच्यात सुसंवाद असेल तर कामे लवकर होऊन नागरिकांना याचा लाभ होऊन लोकाभिमुख कारभार होईल असेही  त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

आयुक्त मंगेश चितळे ....
यावेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिकेच्या विविध विभागांनी 10वर्षात केलेल्या व सुरू असलेल्या कामांचा सविस्तर माहिती दिली.महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेच परंतु पुढील काळात अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवावे लागतील असे सांगितले. महापालिकेपुढे अनेक आव्हाने आहेत,पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी एकत्रितपणे काम केल्यास महापालिका प्रगतीच्या शिखरापर्यंत पोहचेल असे सांगितले. 

सभागृह नेते प्रकाश बिनेदार....
यावेळी सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त गणेश देशमुख यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या विकासकामांची खरी सुरूवात झाल्याचे सांगितले.सर्व घटकांना न्याय मिळावा, गरजवंताना तातडीने मदत महापालिकेने करावी यादृष्टीने सर्वांनी काम केले पाहिजे. पनवेल महानगरपालिका ज्या पध्दतीने काम करते त्या कार्यशैलीची उदाहरणे इतर महापालिकांमध्ये दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

लाभार्थ्यांना धनादेशाने वाटप .....
वर्धापनदिनाचे औचित्याने महानगरपालिका अंतर्गत रमाई आवास घरकुल योजेनेचा लाभ मिळालेल्या सुंदराबाई जाधव, केतन जाधव, गोविंद गायकवाड व रघुनाथ जाधव या चार लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 25 हजार रूपये मान्यवरांच्या हस्ते धनादेशाने वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना परिवहन उपायुक्त कैलास गावडे यांनी तसेच आभार उपायुक्त डॉ.वैभव विधाते व सुत्रसंचालन मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी केले.यावेळी महापालिका सदस्य मनोज भुजबळ, दर्शना भोईर, प्रिती जॉर्ज, रूचिता लोंढे, प्रियंका कांडपिळे, डॉ. अस्मिता घरत तसेच उपायुक्त डॉ वैभव विधाते, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त मंगला माळवे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, शहर अभियंता राजेश कर्डिले, सहायक आयुक्त बाळाराम रातांबे, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.भगवान गीते, डॉ.मधुलिका लाड,अधिक्षक प्रकाश गायकवाड,अधिक्षक किर्ती महाजन, घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे,कनिष्ठ अभियंता प्रितम पाटील तसेच महापालिका अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.


पनवेल महानरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आज महापालिका मुख्यालय व चारही प्रभाग समिती येणाऱ्या सर्व अभ्यागतांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment