महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.ममता प्रितम म्हात्रे यांचा पुढाकार; पनवेल महापालिकेत SHE-Box पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी,महिला सुरक्षिततेला मिळणार नवे बळ .... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाच्या महिला सुरक्षितता उपक्रमाला पनवेल महापालिकेत गती; प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती करण्याबाबत घेतला पुढाकार
पनवेल | प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या SHE-Box (Sexual Harassment Electronic Box) या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलची पनवेल महानगरपालिकेत प्रभावी अंमलबजावणी व्हावी,याउद्देशाने महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.ममता प्रितम म्हात्रे यांनी महापालिकेत पत्राद्वारे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. या पत्रामध्ये महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये सोबतच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व विविध कार्यालयांमध्ये SHE-Box पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
सौ.ममता प्रितम म्हात्रे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की,कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ रोखण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेले SHE-Box पोर्टल हे महिलांसाठी सुरक्षित,विश्वासार्ह आणि ऑनलाइन तक्रार नोंदविण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे.या पोर्टलची माहिती प्रत्येक महिला अधिकारी,कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित महिलांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये SHE-Box पोर्टलबाबत विशेष जनजागृती अभियान,प्रशिक्षण कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, QR Code, माहिती फलक,पोस्टर्स उपलब्ध करून महिलांना ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था,शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातूनही या पोर्टलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे म्हणाल्या,पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. SHE-Box हे त्यापैकी एक प्रभावी डिजिटल व्यासपीठ असून प्रत्येक महिलेला त्याची माहिती मिळणे आणि गरज पडल्यास निर्भयपणे त्याचा वापर करता येणे आवश्यक आहे. पनवेल महानगरपालिकेत या पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृतीसाठी महिला व बालकल्याण समिती सातत्याने प्रयत्नशील राहील."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देणारे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. SHE-Box हे त्याच दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण आहे. महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला पुढाकार निश्चितच स्वागतार्ह आहे. या माध्यमातून महिला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल, तक्रार निवारण व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि महिला सुरक्षिततेला नवे बळ मिळेल."
श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे
भाजप नेते
महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत केंद्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाची पनवेल महानगरपालिकेत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बालकल्याण समितीने उचललेले हे पाऊल महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Post a Comment