News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रथमेश सोमण यांची दिल्लीत भेट‌...‌केंद्रीयमंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे शिलार धरणासाठी निधीची मागणी

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रथमेश सोमण यांची दिल्लीत भेट‌...‌केंद्रीयमंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे शिलार धरणासाठी निधीची मागणी

​नवी दिल्ली / पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात शिवसेना नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री.ना.सी.आर.पाटील यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. शिलार धरण प्रकल्पासाठी पनवेल महापालिकेच्या हिश्याचा निधी केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळावा, यासाठी ही विशेष बैठक पार पडली व त्यांना मागणीपत्र सादर करण्यात आले.  

​कर्जत तालुक्यातील 'शिलार धरण' प्रकल्पातून पनवेल महापालिकेसाठी दररोज ५०० द.ल.लि. पाणी मंजूर झाले असून, या प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च ₹४,८६९.७२ कोटी इतका आहे. यामध्ये पनवेल महापालिकेचा भागभांडवली हिस्सा सर्वाधिक ७५.४२% म्हणजेच ₹३,६७२.७५ कोटी इतका आहे. पनवेल महापालिकेची स्थापना नव्याने झाली असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे व उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत. त्यामुळे एवढा मोठा निधी महापालिकेला एकट्याने उभारणे अशक्य असल्याने केंद्राच्या 'अमृत २.०' किंवा विशेष योजनेतून मदत मिळावी, अशी विनंती या बैठकीत करण्यात आली.  
​राज्य शासनाकडून अधिकृत प्रस्ताव येताच नीती आयोगामार्फत निधी देण्याचे आश्वासन ...
​केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी सर्व म्हणणे अत्यंत काळजीपूर्वक ऐकून घेतले आणि पनवेलकरांसाठी नक्की मदत करण्याचे आश्वासन दिले.या प्रस्तावाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची सूचना केली. "या प्रस्तावाला नीती आयोगाची मंजुरी घेऊन निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत अधिकृत प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त होणे आवश्यक आहे," असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आणि राज्य सरकारकडून तातडीने प्रस्ताव मागवण्याचे सुचवले.
खासदार बारणे यांच्या नेतृत्वात ॲड.प्रथमेश सोमण यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन पनवेलच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण मार्ग सुकर केला आहे.याप्रसंगी पनवेल शहर संघटक अभिजित साखरे हेदेखील उपस्थित होते.
​स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार केंद्रीय मंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्य शासनाकडून अधिकृत प्रस्ताव लवकरात लवकर केंद्राकडे पाठवण्यासाठी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली जाणार आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन घेऊन राज्य सरकारकडून हा प्रस्ताव तातडीने मंजुरीसह केंद्राकडे पाठवण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल,असे प्रथमेश सोमण यांनी सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment