आकुर्लीतील मातृछाया प्री-प्रायमरी शाळेत आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा ... मान्यवरांची उपस्थिती
पनवेल - नवीन पनवेल परिसरातील मातृछाया प्री-प्रायमरी शाळा,आकुर्ली येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतून पारंपरिक दिंडीचे आयोजन करण्यात आले.दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी विठ्ठल-रुक्मिणी,वारकरी तसेच संतांच्या विविध वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
यानिमित्ताने फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच भक्तीगीते सादर झाली.मातृछाया प्री-प्रायमरी शाळा नेहमीच लहान मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचे उपक्रम राबवते.
या सोहळ्याला आ.विक्रांत पाटील यांच्या सौभाग्यवती सौ.मोहिनी पाटील,पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ.स्नेहल ढमाळे,माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर,उद्योजिका सौ.रेश्मा भोईर,सौ.माधवी म्हात्रे,सौ.रेश्मा कुरूप (साहस फाउंडेशन),जागृतीज फाउंडेशन नाशिक शाखा पनवेलच्या अध्यक्षा सौ.गौरी अमोल क्षीरसागर,उपाध्यक्षा सौ.निलम प्रशांत वाघमारे,ॲड.सौ.जयंती नाईक,सौ.तृप्ती,सौ.आरती,माजी सरपंच सौ.योगिताताई पाटील - सुकापूर,सौ.प्राज्ञाताई उबाळे - महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या, साहित्यिका ज्योत्सना राजपूत, कवयित्री छाया गोवारी,शाळेच्या प्राचार्या प्रणिता गुल्हाणे,श्री.उमेश गुल्हाणे, स्नेहा मलकनवर,सौ.मंजिरी सिंग,सौ. श्रद्धा शिर्के उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातृछाया प्री-प्रायमरी शाळेचे सर्व शिक्षकवृंद,कर्मचारीवर्ग आणि प्राचार्या प्रणिता यांनी मेहनत घेतली.
Post a Comment