शिवसेना पनवेल पदाधिकारी राहुल गोगटे यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय मदत कक्षातून रुग्णास मिळाली ५८ हजारांची बिलातून सूट
पनवेल : - पनवेल तालुक्यातील जाताडे या गावी राहणारा श्लोक किशोर म्हात्रे या सहा वर्षाय मुलगा घरात खेळताना पडला असता त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. मुलाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ठिक नसताना देखील त्यांनी नवी मुंबई बेलापूर अपोलो हॉस्पिटल येथे उपचारासाठी ठेवले.अशा परिस्थिती मुलाचे वडील किशोर म्हात्रे यांनी शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक राहुल केशव गोगटे यांच्याशी संपर्क साधून बिलातून सूट मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले.
राहुल गोगटे यांनी या अगोदर देखील अनेकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाद्वारे मदत मिळवून दिली आहे. यावेळी देखील त्यांनी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच नितेश सर यांच्याशी संपर्क साधून अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या मुलास ५८ हजार रुपयांची मदत मिळवून देत किशोर म्हात्रे यांना मदतीचा हात दिला आहे.
अपोलो हॉस्पिटलमध्ये असताना श्लोक याचे अत्यंत कठीण परिस्थिती त्याचे ऑपरेशन करण्यात आले.श्लोक आता बरा असून पनवेल येथील मोहिते हॉस्पिटल येथे पुढील उपचार घेत आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या या मदतीबद्दल किशोर म्हात्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, नितेश सर व शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment