सुकापूर परिसरात विजेचा लपंडाव .... लवकर मार्ग काढला नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार
पनवेल - सुकापूर परिसरामध्ये सुरू असलेला विजेचा लपंडाव आणि त्यातून नागरिकांना होणारा मानसिक त्रास या दृष्टिकोनातून पनवेल येथील टपाल नाका स्थित महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या मुख्य कार्यालयास शेकाप तालुका चिटणीस मा.उपसभापती राजेश केणी यांनी भेट देऊन तेथील सहाय्यक अभियंता सुप्रिया बल्लाळ यांची भेट घेतली आणि नागरिकांना होणारा त्रास विषद केला.यावर निश्चितपणानं मार्ग काढू असा शब्द सहाय्यक अभियंता सुप्रिया बल्लाळ यांच्यावतीने देण्यात आला.
संबंधित विजेचा लपंडाव हा महानगर गॅससाठी खोदल्या जाणाऱ्या खड्ड्यांमुळे होत असल्याची चर्चा त्यांच्याकडून घडली तेथूनच नवीन पनवेलचे अभियंता श्री राणे यांच्याशी संवाद साधला आणि सुकापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील विजेच्या समस्येवर प्रॉपर मार्ग काढला जाईल अशा पद्धतीने चर्चा झाली.राजेश केणी यांनी देखील या चर्चेअंती जर यावर लवकर मार्ग नाही काढला गेला तर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आणि सुकापूरच्या नागरिकांच्यावतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल असे सागितले.
Post a Comment