News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उद्या पनवेलमध्ये हिंदू संमेलन‌.....शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवशस्त्र गाथा आणि युद्धकला प्रात्यक्षिके ...हिंदू संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा’ या विषयावर बाल वेशभूषा स्पर्धा.......नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे –सकल हिंदू समाज

उद्या पनवेलमध्ये हिंदू संमेलन‌.....शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवशस्त्र गाथा आणि युद्धकला प्रात्यक्षिके ...हिंदू संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा’ या विषयावर बाल वेशभूषा स्पर्धा.......नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे –सकल हिंदू समाज

पनवेल : सकल हिंदू समाज, साईनगर,किनारा वस्ती तसेच पायोनियर वस्ती,पनवेल यांच्यावतीने रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता साईनगर सोसायटीच्या मैदानावर सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हिंदू संस्कृतीचे जतन,परंपरेचा अभिमान आणि समाजातील एकात्मता दृढ करण्याच्या उद्देशाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.या संमेलनात हिंदुत्व,संस्कृती,राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे.कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री.मनोजजी शंभू सिंह, सौ.रुपालीजी जोशी आणि श्री. विवेकजी भागवत हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

पनवेल शहरातील विविध ढोल-ताशा पथकांनी महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जपत ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाचा गौरव करण्यासाठी या संमेलनात ढोल-ताशा पथकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.याशिवाय, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन,शिवशस्त्र गाथा आणि युद्धकला प्रात्यक्षिके यांसारखी विशेष आकर्षणे नागरिकांसाठी ठेवण्यात आली आहेत तसेच ‘हिंदू संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा’ या विषयावर बाल वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाद्वारे हिंदू समाज एकत्र येऊन संस्कृती जपण्याचा तसेच भावी पिढीमध्ये संस्कार रुजविण्याचा संदेश प्रमुख वक्त्यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
तरी पनवेल परिसरातील सर्व नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य संमेलनात सहभागी व्हावे, तसेच आपल्या पथकांसह उपस्थित राहून सन्मान स्वीकारावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment