प्रलंबित पनवेल एसटी डेपो प्रकल्प मार्गी लागणार! .....आ.प्रशांत ठाकूर यांचा पाहणी दौरा... पनवेलचे महापौर नितीन पाटील,महिला बालकल्याण समितीचे सभापती ममता प्रीतम म्हात्रे,नगरसेवक,भाजपाचे पदाधिकारी यांची उपस्थिती
पनवेल - पनवेल एसटी बस डेपोचा आज पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी दौरा केला.पनवेल एसटी डेपोचे बांधकाम दीर्घकाळ प्रलंबित राहिले होते मात्र,या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी आता ठोस पावले उचलण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.आज संबंधित पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी,एसटी प्रशासन व कंत्राटदारांसोबत सविस्तर बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली तसेच डेपो परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामाला गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील,पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ.ममता प्रीतम म्हात्रे, नगरसेवक,भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विमानतळ प्राधिकरणाची मर्यादा, पर्यावरणीय परवानग्या आणि इतर प्रशासकीय अडचणींमुळे प्रकल्पाला विलंब झाला होता. मात्र,आता सर्व अडथळे दूर करून नियोजनबद्ध पद्धतीने काम पुढे नेण्याचा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.पावसाळा जवळ आल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
पनवेलकरांना आधुनिक,सुसज्ज आणि सुरक्षित एसटी डेपो मिळावा, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Post a Comment