News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल येथे “आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य अ‍ॅक्वेरियम केंद्र” उभारणी संदर्भात आमदार विक्रांत पाटील यांची मागणी! मंत्री नितेश राणे यांचा सकारात्मक प्रतिसाद व विशेष बैठकीचे आयोजन!

पनवेल येथे “आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य अ‍ॅक्वेरियम केंद्र” उभारणी संदर्भात आमदार विक्रांत पाटील यांची मागणी! मंत्री नितेश राणे यांचा सकारात्मक प्रतिसाद व विशेष बैठकीचे आयोजन!

पनवेल - पनवेल सारख्या भौगोलिक महत्त्व असलेल्या व  झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात एखादा मोठा पर्यटनदृष्टीने महत्वाचा प्रकल्प असणे आवश्यक आहे या दूरदृष्टीने आमदार विक्रांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2026  मागणी केली होती.याविषयावर मंत्री नितेश राणे यांनी प्रस्तावाचे कौतुक करत याविषयाची तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. 

आज याविषयाची महत्त्वपूर्ण बैठक मंत्री मत्स्यव्यवसाय श्री. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्या सोबत आयोजित करण्यात आली होती.या बैठकी दरम्यान आमदार विक्रांत पाटील यांनी  पनवेलचे भौगोलिक महत्त्व व या आंतराष्ट्रीय दर्जाच्या अ‍ॅक्वेरियमची आवश्यकता हे विषय विस्तृतपणे माहिती देऊन पटवून दिले.  

विशेषतः जवळच साकारलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नव्याने होत असलेली  तिसरी मुंबई तसेच नैना प्रकल्प यामुळे यासंपूर्ण भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे  असा अ‍ॅक्वेरियमचा प्रकल्प  आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाला चालना देणारा ठरेल. तसेच या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचा अभ्यास, शैक्षणिक संशोधन आणि स्थानिक रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल, याचे महत्व आमदार विक्रांत पाटील यांनी पटवून दिले.

या प्रकल्पासाठी लागणारी जागा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ  यांच्या माध्यमातून पनवेल येथील मत्स्य उपकेंद्राच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असून हि जागा गोडे पाणी व खारे  पाणी याची उपलब्धता असणारी आहे. तसेच  प्रकल्पाच्या पुढील विकासासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभाग पुढील आवश्यक ती  कार्यवाही करणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.  

या प्रकल्पामध्ये सागरी तसेच गोड्या पाण्यातील विविध जीवसृष्टीचे प्रदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अ‍ॅक्वेरियम,तसेच पर्यटकांना आकर्षित करणारे “सी लायन शो” यांसारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे.
हा प्रकल्प आंतराष्ट्रीय दर्जाचा असणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे सल्लागार नियुक्त केले जातील असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.

या बैठकीस आयुक्त मत्स्य विभाग- श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे,कोंकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी,इतर तज्ज्ञ आणि जिल्हाधिकारी कार्यालय रायगड चे अधिकारी उपस्थित होते.
पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचा विश्वास मा.  आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment