द्रोणागिरी येथे क्रेन अपघातात मृत्यू झालेल्या कस्टम एजंट कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा अपघात मोबदला मागणी दावा मोटार अपघात ट्रिब्यूनल ठाणे यांनी फेटाळला.......या खटल्याकामी श्री.विनायक कोळी,श्री सुमंत तावडे,श्री प्रदीप नायर आणि श्रीमती नावडकर यांनी काम पाहिले
ठाणे - क्रेन अपघातात मृत्यू झालेल्या डॉक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा अपघात मोबदला मागणी दावा मोटार अपघात ट्रिब्यूनल ठाणे यांनी फेटाळला.ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये सुरू असलेला मोटार अपघात मोबदला मागणी खटला मा.न्यायाधीश श्री.के.पी.श्रीखंडे यांनी फेटाळून लावला.
द्रोणगिरीमध्ये घडलेल्या एका मोटार अपघातात मृत्यू झालेल्या ३२ वर्षीय डॉक कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी मोटार अपघात ट्रिब्यूनल ठाणे येथे लाभासाठी दावा दाखल केला होता.या प्रकरणात कुटुंबीयांनी रु.50 लाख अपघात मोबदला मिळावा यासाठी अर्ज केला होता.या अर्जामध्ये त्यांनी विषयांकित अपघात हा मशीन चालकाच्या बेदरकार चालवल्यामुळे झाला होता असे नमूद केले होते.मात्र, एमएसीटी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार,संबंधित अपघात ग्रस्तांने सुरक्षा साधनांचा वापर न करता प्रतिबंधित खाजगी क्षेत्रात प्रवेश केला होता.
प्राधिकरणाच्या चौकशीत असे स्पष्ट झाले की,संबंधित कर्मचाऱ्याला पूर्वीच सुरक्षा नियमांची माहिती होती तरीदेखील त्याने नियमांचे पालन न केल्यामुळे हा अपघात घडल्याचे अहवालात नमूद आहे.सदरील मशीनवर तिच्यापासून दहा मीटर दूर राहावे अशी सूचना छापलेली असते त्याकडे अपघातग्रस्त व्यक्तीने दुर्लक्ष करून सदरील मशीन सुरू असताना तिच्या निर्धारित मार्गिकामध्ये त्यांनी प्रवेश केलेत्यामुळे हा अपघात झाला तसेच मशीन मालकाच्या कंपनीच्यावतीने मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने रु.31 लाखाची मदत अपघातानंतर लगेच देण्यात आली होत.
या सर्व बाबींचा विचार करता या मोटार वाहन कायद्यान्वये मयत व्यक्तीच्या वारसाना अतिरिक्त लाभ देण्यास नकार देण्यात आला आहे.या खटल्याकामी श्री.विनायक कोळी,श्री. सुमंत तावडे,श्री प्रदीप नायर आणि श्रीमती नावडकर यांनी काम पाहिले.
Post a Comment