नवीन पनवेलमध्ये 'जय पार्श्व लब्धि महिला मंडळाची स्थापना
पनवेल - : धार्मिक कार्यासोबतच समाजसेवा करण्यासाठी नवीन पनवेलमधील जैन महिलांनी एकत्र येत 'जय पार्श्व लब्धि महिला मंडळाची नीव ठेवण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून आगामी काळात विविध धार्मिक विधी आणि लोककल्याणाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प महिलांनी केला आहे. या सेवाकार्याचे पहिले पाऊल म्हणून नवीन पनवेल येथील सेक्टर-१ मधील शिवा कॉम्प्लेक्स परिसरात अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मंडळाची स्थापना आणि सामाजिक उपक्रमाचा प्रारंभ सीमा कांकरिया,पुष्पा गांधी,पद्मावती जैन,चंचल चपलोत, कल्पना कोठारी,ज्योती बाफना,मंजु चतुर आणि कुमारी करुणा गांधी यांच्या पुढाकाराने करण्यात आला.समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासोबतच जैन धर्मातील मूल्यांची जोपासना करणे, हे या मंडळाचे मुख्य ध्येय आहे. केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता, विविध समाजोपयोगी मार्गांनी उत्कृष्ट कार्य घडावे,अशी भावना यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
Post a Comment